मुरबाड मध्ये डॉक्टरला मारहाण घटनेच्या निषेधार्थ दवाखाने बंद

The clinics are closed at Murbad
The clinics are closed at Murbad

मुरबाड (ठाणे) - मुरबाड शहरातील एका डॉक्टरला मारहाण करून त्याच्या दवाखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी ता. 4 एका इसमाला ताब्यात घेतले. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ मुरबाड मधील डॉक्टरांनी दुपार नंतर आपले दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव दयाशंकर पांडे असे आहे ते हनुमान आळी येथे आपल्या दवाखान्यात रुग्ण तपासत असताना आदित्य गुजरे नावाच्या इसमाने तेथे येऊन खाजगी कारणावरून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दवाखान्याची तोडफोड केली.

याघटनेची माहिती मिळताच शहरातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला व मारहाण करणाऱ्या इस्मावर कठोर कारवाई करून पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी मुरबाड पोलीस ठाणे व तहसीलदार सचिन चौधर यांना मुरबाड तालुका वैद्यकीय संघटने तर्फे निवेदन देण्यात आले. तसेच आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी व डॉक्टरांना पुरेसे संरक्षण द्यावे अशी मागणी केली.

दरम्यान मुरबाड तालुका केमिस्ट संघटनेने सुद्धा या घटनेचा निषेध केला असून आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दीपक शहा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com