मुंबईकरांना प्रवेशबंदी! रायगडच्या सागरी सीमा बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

अलिबाग : रस्ते मार्गाने जिल्ह्यात होणारी वाहतूक पूर्णपणे थांबवल्यानंतर सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीलादेखील पूर्णविराम देण्यात आला आहे. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाग्रस्त सापडल्याने सागरी मार्गाने काही नागरिक रेवस, मांडवा बंदरात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने जिल्ह्याच्या सागरी सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी : महाराष्‍ट्रात सरकार विरुध्‍द राज्‍यपाल असा नवा संघर्ष सुरु होण्‍याचे संकेत 

मुंबईतील नागरिकांचे पलायन रोखण्यासाठी मांडवा, दादर, दिघी सागरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी समुद्रात दिवसरात्र गस्त घालत आहेत. त्यांच्या मदतीला सागरी सुरक्षा रक्षक, नेव्ही, बंदर विभाग, मत्स्य व्यवसाय विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. मच्छीमार संस्थांचे सदस्यदेखील या घुसखोरांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे मासेमारी नौकांदेखील बंदरात नांगरून आहेत. बंदरात येणाऱ्या प्रत्येक नौकेची तपासणी, त्यावरील खलाशांची नोंद बंदर अधिकारी करीत असतात, तरीही मुंबईतील काही नौका रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आढळून आल्या. यातून सावध झालेल्या प्रशासनाने जिल्ह्यातील सागरी सीमा सक्तीने बंद केल्या असून तेथे पहारा वाढवला आहे.

हेही वाचा : व्‍यसनी लोकांनी आता सिगारेटच्‍या टपऱ्याही फोडल्‍या...

पहारा वाढवला 
मांडवा, रेवस, वरसोली येथील अनेकांचे नातेवाईक मुंबईतील वरळी, ससून डॉक, मोरा, नवी मुंबई येथे आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच जण तिथेच अडकले आहेत. मिळेल त्या मार्गाने ते तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील बंदरांवर पहारा ठेवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. जे. यमगर यांनी दिली. 

रायगडमधील जवळपास सर्वच नौका बंदरात आहेत. जिल्ह्यातील बंदरात येणाऱ्या नौकेची नोंद बंदर विभागाकडे केली जात आहे. यास मच्छीमारी संस्थादेखील चांगले सहकार्य करीत आहेत. मुंबईतून पलायन करणाऱ्या सागरी मार्गाचा अवलंब करू शकतात. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. 
- सुरेश भारती, सहायक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close to the coast of Raigad