esakal | मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्मिला यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्मिला यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर चांगलाच हल्लाबोल केला होता. 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर मुंबईतून त्यांना काँग्रेसनं उमेदवारीही दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर अंतर्गत होणाऱ्या राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नसल्याचं उत्तर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाला कळवलं. मात्र तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं समजतं.

अधिक वाचाः  मिठाईवर कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी FDAची कारवाई, विक्रेत्यांकडून 51 हजारांचा दंड वसूल

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासाठी विचार सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून उर्मिला यांच्याशी फोनवरुन बातचीत केली आहे. मात्र उर्मिला यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही. 

अधिक वाचाः  मुंबईकरांनी बुधवारी अनुभवली लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा

शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

CM calls Urmila Matondkar possibility getting candidature from Shiv Sena for Legislative Council

loading image