मिठाईवर कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी FDAची कारवाई, विक्रेत्यांकडून 51 हजारांचा दंड वसूल 

भाग्यश्री भुवड
Friday, 30 October 2020

मिठाईच्या दुकानात कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी एफडीएने कारवाई केली असून आतापर्यंत 7 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 51 हजारांचा दंड अन्न आणि औषध प्रशासनाने वसूल केला आहे.

मुंबई: मिठाईच्या दुकानात कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी एफडीएने कारवाई केली असून आतापर्यंत 7 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 51 हजारांचा दंड अन्न आणि औषध प्रशासनाने वसूल केला आहे. संपूर्ण राज्यात एकूण 92 आस्थापनांची तपासणी केली गेली. त्यात मुंबईसह उपनगरात 56 आस्थापनांचा समावेश होता. तर, अमरावतीतील 36 आस्थापनांचा समावेश होता.

मिठाईच्या दुकानात असणाऱ्या खुल्या स्वरुपातील मिठाईची उत्पादन दिनांक दर्शवणे, ऐच्छिक तर बेस्ट बिफोर तारीख दर्शवणे बंधनकारक असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम मिठाई विक्रेत्यांना लागू झाला आहे. त्यानुसार, काही ठिकाणच्या विक्रेत्यांनी अजूनही दुकानातील मिठाईवर कालबाह्यता तारीख लिहायला सुरुवात केलेली दिसत नाही. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या 7 कारवाईमध्ये 51 हजारांचा दंड वसूल केला आहे.

मुंबईत जवळपास 800 ते 900 मिठाईची दुकाने आहेत. जिथे वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई उपलब्ध करुन ग्राहकांनी दिली जाते. मात्र, या दुकानात तयार होणाऱ्या मिठाईंमध्ये अनेकदा भेसळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत एफडीएने मिठाईवर कालबाह्यता तारीख लिहिणे विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे.

अधिक वाचाः  कोरोना रूग्णांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे, मुंबईत आढळला पहिला रुग्ण

त्यासोबतच विक्रीस ठेवलेल्या मिठाईच्या प्रकारांनुसार स्थानिक परिस्थितीनुसार, ती मिठाई कधीपर्यंत खावी याची तारीख ठरवून ती देखील प्रदर्शित करावी असेही या सुचनांमध्ये लिहिण्यात आले आहे. 

त्यानुसार खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मिठाई घेताना मिठाईवरील तारीख बघूनच ती खरेदी करावी असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी केले आहे. 

अधिक वाचाः  मुंबईकरांनी बुधवारी अनुभवली लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा

8 तारखेपासून या मोहिमेच्या तपासणीला पूर्णपणे सुरुवात केली जाणार आहे. कारण, 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू झाला आहे. त्यानुसार, काही विक्रेत्यांनी दुकानातील खुल्या मिठाईवर तारीख लिहायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 7 मिठाई विक्रेत्यांवर कारवाई केली गेली आहे. मिठाई विक्रेत्यांनी तात्काळ या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. 

शशिकांत केकरे ,सह आयुक्त (अन्न), एफडीए

ग्राहकांना ही आवाहन

ही ग्राहक आणि विक्रेत्यांची मोहिम असून मिठाई खरेदी करताना त्यावरील सूचना वाचावी. खुल्या मिठाईच्या किंमतीसह कालबाह्यता म्हणजेच त्यात तारीख, कधीपर्यंत खावी ही तारीख लिहिणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षेसाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. ग्राहकांनी ही यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

FDA action not writing expiration date sweets fine Rs 51 thousand recovered


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA action not writing expiration date sweets fine Rs 51 thousand recovered