मुंबईकरांनी बुधवारी अनुभवली लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा

मुंबईकरांनी बुधवारी अनुभवली लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा

मुंबई:  मुंबईकरांनी बुधवारी लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा अनुभवली असून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.  बुधवारी कोविड 19 च्या लॉकडाऊननंतर शहरात सर्वात दुषित हवेची नोंद झाली. मुंबईच्या आकाशात धुराचा एक थर आकाशात पसरला.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी येथे सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद झाली आहे. हवेचे गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 120 मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. शिवाय, मुंबईचीही हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर, मालाडमध्येही 169 एक्यूआय एवढा निर्देशांक नोंदवला असून पीएम 2.5 मध्यम दर्जाची हवा नोंदवली आहे. 

कुलाबा (10), माझगाव (2.5) आणि चेंबूर (2.5) येथे मध्यम एक्यूआय नोंदवण्यात आले. पीएम 2.5 प्रदूषक साठी, प्रदूषक-मोजण्याचे सूचक 125 (मध्यम) नोंदवले गेले. 

बुधवारी किमान तापमानातही मुंबईत किंचित घट झाली. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ हवामान केंद्रामध्ये किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्य तापमानाजवळ आहे. सोमवारी रात्रीचे तापमान 25 अंश सेल्सिअस तापमानात सामान्यपेक्षा तीन अंशाच्या वर होते. बोरिवली पूर्वमध्ये सर्वात कमी किमान 18.5 अंश नोंदले गेले, तर पवईत 20 अंशांची नोंद झाली.  माझगावमध्ये ही 125 एक्युआय हवेचा दर्जा नोंदवण्यात आला असून मध्यम हवेची नोंद करण्यात आली आहे. 

वरळी आणि बोरीवलीची हवा समाधानकारक

दरम्यान, वरळी, भांडूप आणि बोरिवलीची हवा समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. वरळीच्या हवेचा दर्जा 88 एक्युआय एवढा नोंदवण्यात आला आहे. तर, बोरीवलीत 92 एक्युआय एवढा नोंद करण्यात आला असून या दोन्ही ठिकाणची हवा समाधानकारक नोंदली गेली आहे. 

बुधवारी दक्षिण मुंबईत आयएमडीने कुलाबा हवामान केंद्रामध्ये किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 1.1 डिग्री अंश 
सेल्सिअस अधिक आहे.

नैऋत्यच्या मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर आर्द्रता आणि तापमानात घट होण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली. 24 तासांच्या अंदाजानुसार शहरातील किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. दरम्यान, आयएमडीने बुधवारी संपूर्ण देशातर्फे नैरुत्य मॉन्सून माघार घेणार असल्याची घोषणा केली आहे. 

संपूर्ण मुंबईची हवा दुषित

संपूर्ण मुंबईतील हवा सध्या मध्यम दर्जाची नोंद करण्यात आली असून कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसी, चेंबूर, अंधेरी, नवी मुंबई या संपूर्ण शहराची हवा दुषित असल्याची नोंद सफर या संस्थेने केली आहे.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbaikars experienced most polluted air since lockdown Wednesday Bandra Kurla Complex leads in pollution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com