CM Devendra Fadnavis
easkal
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी आलेल्या सध्याच्या क्लस्टर योजनेमुळे इमारतींची समस्या आणखी गंभीर होऊ शकते. यासाठी लोकांना आवश्यक असलेल्या बदलांनुसार क्लस्टरचे नवे धोरण तयार केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे केली. सूर्या पाणी योजनेतूनही याच वर्षी नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.