

Devendra Fadnavis latest news
Esakal
मुंबई : "गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांची आहे," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 'गणेशोत्सव-२०२६' निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात 'सह्याद्री' अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा आढावा घेतला.