Cm Devendra Fadnavis
sakal
मुंबई - मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. मुंबईचे प्रश्न, अडचणी समजण्यासाठी मुंबईत जन्माला यावे लागते, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘तुम्ही इतकी वर्षे मुंबईतील मराठी माणसांसाठी काय केले, याचे उत्तर द्यावे,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावले आहे.