

Best Inaugurates 157 New AC Buses
ESakal
मुंबई : 'बेस्ट'च्या परिवहन विभागाला सध्याच्या स्पर्धेच्या काळात उत्पन्नासाठी केवळ तिकीटविक्रीवर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करून स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहावे लागेल, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा फायद्यात नसते; पण योग्य नियोजन आणि नव्या संधींचा लाभ घेतल्यास 'बेस्ट'ला आत्मनिर्भर करता येईल, असा विश्वास व्यक्त करून मुंबई महापालिकेकडून बेस्टला सातत्याने मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे त्यांनी कौतुक केले.