

Maharashtra Global Capability Center
ESakal
मुंबई : जागतिक गुंतवणूक कंपनी ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज महाराष्ट्रात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) सुविधा स्थापन करण्यासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. ही सुविधा आशियातील सर्वात मोठी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना या मोठ्या गुंतवणुकीला दुजोरा दिला.