

मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांच्या दिवाळी सुट्टीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि अन्य नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र पडसाद उमटले. याबाबत सर्वच पक्षाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्र्यांच्या या नाराजीची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन यावर तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश दिले. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.