

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis
esakal
मुंबई : हॅकिंग केवळ डेटा चोरी किंवा आर्थिक फसवणुकीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. वेगाने उदयास येणारे नवनवीन तंत्रज्ञान तरुणांचे किंवा संपूर्ण पिढीचे मन हॅक करून अराजकता पसरवू शकते. हा भविष्यातला सर्वात मोठा धोका आहे. त्याविरोधात आपल्याला लढा द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस मुख्यालयात केले.