मुंबईकरांचा होणार फायदा! भाडेवाढ न होता मिळणार AC लोकल? प्रशासनाने आखला मास्टर प्लॅन, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Devendra Fadnavis: काल मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनचा मोठा अपघात घडला. या घटनेनंतर रेल्वे अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून लोकलबाबत प्लॅन आखला आहे.
मुंबई : सातत्याने रेल्वे लोकल अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे. काल मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनचा मोठा अपघात घडला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.