

State Cabinet approve comprehensive policy
ESakal
मुंबई : नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्र राज्याने पुढचे पाऊल टाकले असून २०२९पर्यंत राज्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्वसमावेशक धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. व्यापक जनजागृती आणि अमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई, असे या धोरणाचे स्वरूप असणार असून यात शासनाच्या सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे. हे सर्वसमावेशक धोरण यशस्वी व्हावे यासाठी ग्राम पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे.