दुर्घटना रोखणारी यंत्रणा मुंबईत लवकरच : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई : मुंबईत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून लवकरच अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. 

महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. 

मुंबईत दुर्घटनाच घडू नये अशी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पोलिस दलाने शहरात पाच हजार सीसीटीव्ही कॅमरे बसवले आहेत. त्यांच्या साह्याने मुंबईतील गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिकेत भ्रष्टाचार व माफियाराज असल्याची टीका भाजप करीत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र पालिकेच्या कामाचे कौतुक केले. शहराला सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिका उपाययोजना करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. 

कामांचा धडाका लावू : उद्धव 
शिवसेना - भाजप युतीने 20 वर्षांत पालिकेमार्फत अनेक कामे केली आहेत. निवडणुकीपूर्वी चांगल्या कामांचा धडाका लावू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी महापालिकेचे कौतुक केले. महापालिका अनेक कामे करीत असते; परंतु पालिकेचे पथक पोचेपर्यंत नागरिकांनी काय करावे यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Cm Devendra Fadnavis talks about Disaster Management in Mumbai