Vidhan Sabha 2019 : गोपीचंद पडळकरांना बारामतीची उमेदवारी; मुख्यमंत्र्यांची इच्छा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

गोपीचंद पडळकर यांना बारामती रिंगणात उतरवण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

मुंबई : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज, भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईमधील भाजप मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. गोपीचंद यांचा भाजप प्रवेश माझ्यासाठी आनंददायी असल्याचे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. गोपीचंद पडळकर यांना बारामती रिंगणात उतरवण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या मेगाभरतीत दोन नेत्यांचा प्रवेश

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. राज्यातील एक तरुण आणि तडफदार नेते आहे. ते मुळचे भाजपचे आहेत. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्याशी त्यांचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, ते म्हणाले माझा निर्णय झाला आहे. समाजासाठी मी निर्णय घेतो आहे. पण, समाजाचा विकास करायचा असेल, तर विरोधीपक्षात राहून चालणार नाही. आज त्यांना पक्षात परत घेताना मला खूप आनंद होत आहे.

राज ठाकरे यांनी जाहीर केली पहिल्या सभेची तारीख

मुख्यमंत्री म्हणाले, 'गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. या वाघाला आपण बारामतीमधून रिंगणात उतरवू. तुमची तयारी आहे? असं असेल तर, मी पक्षाशी बोलतो आणि त्यांना आपण बारामतीमधून निवडून आणू. आपण बारामती जिंकून दाखवू.' बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असून, त्यांचे पुतणे बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पडळकरांच्या उमेदवारीमुळे आता बारामतीच्या लढतीत रंगत निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis wants to give candidacy to Gopichand Padalkar from Baramati for Maharashtra Vindhan Sabha 2019