Sambhaji Raje- Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंकडून संभाजीराजेंची दिलगिरी

मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या प्रश्नासह अन्य काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे गुरुवारी मंत्रालयात
Sambhaji Raje- Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंकडून संभाजीराजेंची दिलगिरी
Updated on

मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आलेल्याc छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करीत संभाजीराजे यांना सन्मानाने भेटीसाठी बोलावले. मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या प्रश्नासह अन्य काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे गुरुवारी मंत्रालयात आले होते. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतल्यावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले.

मात्र, मुख्यमंत्र्यांची अन्य बैठक सुरु असल्याने लगेच भेट होऊ शकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ताटकळलेले संभाजीराजे नाराज होऊन निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे छत्रपतींना भेटण्यास वेळ नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संभाजीराजे यांना दूरध्वनी करून बोलावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.