शिवसेनेच्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

cm
cm

मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रीत करण्यात आलं असून त्यांचं मार्गदर्शनपर भाषण ही होणार आहे.

उद्या संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शीव येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्विकारत शिवसेना वर्धापन दिनाला येण्याचं मान्य केलंय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीच्या रणनितीचं मार्गदर्शन ही यावेळी होणार आहे.लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाही शिवसेना आणि भाजपाने एकदिलाने लढावी आणि मोठा विजय मिळवावा यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपिठावर येत आहेत. 

उद्धव यांच्या भूमिकेकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वर्धापन दिनानिमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची आपली भूमिका उद्धव स्पष्ट करणार असल्याचे समजते आहे.आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा चंग शिवसेनेने बांधल्यामुळे आक्रमकपणे कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे उद्याच्या मेळाव्यातून देणार आहेत.शिवाय ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा,शेतकरी आणि शेतमजूरांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी यावर ही उद्धव मार्गदर्शन करणार आहेत.

उद्धव ठाकरे नुकतेच आयोध्येवरून आले आहेत.आयोध्येतून त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा नारा बुलंद केला आहे.यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना हिंदुत्वाचं कार्ड वापरणार का हे देखील उद्या स्पष्ट होणार आहे.शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावर ही उद्धव हे नाराज आहेत.यावर उद्धव नेमकं काय बोलणार याकडे ही शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव यांच्याबरोबरच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले,औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे देखील उपास्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.यामेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com