बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा

टीम ई-सकाळ
Friday, 6 December 2019

मुंबईत 22 वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणीही मी भेट देणार आहे. त्याचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी माझी इच्छा आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. आज, काळीच राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट देऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणून, मी पहिल्यांदा चैत्यभूमीवर आलो आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले दैवत आहे. मुंबईत 22 वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणीही मी भेट देणार आहे. त्याचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी माझी इच्छा आहे. 22 वर्ष बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकणी मी आता जाणार आहे.' यावेळी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज्यपाल कोशियारी म्हणाले, 'चैत्यभूमीवरच्या लांबच लांब रांगा पाहून, जनसागर इकडे लोटल्याचा भास होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन मी वाचलं आहे. त्यांचा संघर्ष मला माहिती आहे. आज, डॉ. आंबेडकरांना संपूर्ण जगानं स्वीकारलंय. आम्ही सर्वजण डॉ. आंबेडकरांचा आदर्श घेऊन, पुढे जात आहोत.'

ताज्या बातम्या : दिशाला न्याय मिळाला निर्भयाला कधी?

यांनी केले अभिवादन
चैत्यभूमीवर आज, सकाळपासूनच जनसागर लोटला आहे. त्याचवेळी सकाळी राज्यातील नेत्यांनी चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. आंबेडकरांना आभिवादन केले. यात आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुभाष देसाई यांचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray greets late dr. babasaheb ambedkar at chaityabhoomi