Wed, June 7, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं राज्यपालांसोबतचं चहापान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं राज्यपालांसोबतचं चहापान
Published on : 1 May 2022, 5:15 am
महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनालाही भेट दिली. मात्र त्यांनी राज्यपालांसह चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं मात्र टाळलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शिवाजी पार्क इथं ध्वजवंदन सोहळ्यासाठी हजेरी लावली. तसंच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनालाही भेट दिली. मात्र ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत, अशी माहिती हाती येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ऐवजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.