esakal | धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा - CM उद्धव ठाकरे

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : सलग दोन रात्री झालेल्या पावसाने मुंबईला (Mumbai Monsoon) मोठा धक्का बसला आहे. त्यातच पुढील काही दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. आज झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महापालिका अधिकारी तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रात्रीही सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्या बरोबरच धोकादायक इमारती (Danger Zone Building) तात्काळ रिकाम्या करण्यास सुरवात करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर पावसा बरोबर येणाऱ्या आजारांसाठीही तात्काळ फिव्हर क्लिनीक (Fever Clinic) सुरु करण्याचे आदेशही मुख्यमंत्रयांनी दिले आहेत. ( CM Uddhav Thackeray on Mumbai monsoon says empty buildings in danger zone-nss91)

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या वर्धापनदिनात डाॅ.अमोल कोल्हेंचे व्याख्यान, म्हणाले...

सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून बचाव पथके तैनात ठेवावी तसेच दरडीचा धोका असलेले, धोकादायक इमारती तसेच उच्च दाबाच्या विज वाहीन्यांखाली राहाणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कता बाळगून तात्काळ उपाय करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. रात्रीच्या वेळीही पावसाचे पाणी उपसणारी यंत्रणा सज्ज राहील याची खात्री करुन घ्यावी. विकासकामे,अर्थवट कामे या भागात पाणी साचून दुर्घटना होऊ नये,डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी उपाय करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. यावेळी मुंबई शहरचे पालकंमत्री अस्लम शेख, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थीत होते. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना धोकादायक परिस्थितीत राहाणाऱ्यांचे पुनर्वसनाचा तत्काळ निर्णय घेण्याचे आदेशही मुख्यमंत्रयांनी दिले आहेत.

-धोकादायक ठिकाणांवर लक्ष ठेवा

-फिव्हरल क्लिनीक सुरु करा.

-बचाव पथके,वैद्यकिय पथके तैनात ठेवा

आयआयटीच्या तज्ञांची मदत घ्या

दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी उपाय करण्यासाठी आयआयटी तसेच इतर तज्ञांची मदत घ्या. हे भाग सुरक्षीत मजबूत कसे करता येईल याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा असेही उद्धव ठाकरे यांनी  नमूद केले.

loading image