esakal | मुंबई विद्यापीठाच्या वर्धापनदिनात डाॅ.अमोल कोल्हेंचे व्याख्यान, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Amol Kolhe

मुंबई विद्यापीठाच्या वर्धापनदिनात डाॅ.अमोल कोल्हेंचे व्याख्यान, म्हणाले...

sakal_logo
By
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विद्यापीठांनी व्यवसायाभिमूख शिक्षण पद्धतीचा (Education System) अवलंब करून शिक्षणातून रोजगाराच्या (Employment) संधी निर्माण करण्यावरही अधिक भर द्यावा त्याचबरोबर सर्वसमावेशक विद्यार्थ्यांना (Student) प्रेरक आणि पुरक ठरेल अशी वाटचाल विद्यापीठांनी करावी असेही मत लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी व्यक्त केले. ( Dr Amol kolhe speech On Mumbai University Education System-nss91)

मुंबई विद्यापीठाच्या १६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विद्यापीठांचे स्थान’ या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध प्राधिकरणातील सदस्य उपस्थित होते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘जितेंगे हम’ या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा: पावसाने 'नॅशनल पार्क'ला झोडपले, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची कसरत

पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एका त्रिमितीय दृष्टिकोनाची गरज आहे. नविन सहस्त्रकात बदलेल्या तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याची आपली तयारी, नविन शैक्षणिक धोरणाची विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास आणि कल्याणासाठी अंमलबजावणी आणि कोव्हिड काळानंतर बदललेली समाजव्यवस्था, जीवनाकडे बघण्याची दृष्टी याचा समग्र विचार करून विद्यापीठाना पावले टाकावी लागतील असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मागील वर्षभरात विद्यापीठाने अनेक नविन शैक्षणिक उपक्रम सुरु केले असून ज्यामध्ये युनिवर्सल ह्युमन वॅल्यू कक्षाची स्थापना, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची रचना, स्कूल संकल्पना यांचा समावेश असल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने केलेली उल्लेखनिय कामगिरी यासह विविध उपक्रमांची माहिती प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी अहवाल वाचनात दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी केले

loading image