esakal | Sakal Impact: कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची KDMC कडून तातडीने डागडुजी
sakal

बोलून बातमी शोधा

MLA raju patil

Sakal Impact: कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची KDMC कडून तातडीने डागडुजी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याणच्या पत्रिपुलानंतर बहुचर्चित पूल म्हणजे डोंबिवलीतील कोपर पूल ( Kopar Bridge) . दोन दिवसांपूर्वीच या पुलाचे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्र्यांचा (Cm uddhav Thackeray) हस्ते ऑनलाईन उदघाटन (online inauguration) पार पडले. या पुलावर पहिला खड्डा (potholes) पडला असून त्याचे फोटो, मिम्स नागरिकांनी समाज माध्यमावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. याविषयी ई सकाळने (sakal news) गुरुवारी सकाळी वृत्त प्रसारित करताच पालिका (Kdmc) अधिकारी पुलावर धावले आणि अवघ्या काही तासातच खड्डा बुजविला गेला.

हेही वाचा: पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पूल सुरू होण्याची प्रत्येक डोंबिवलीकर आतुरतेने वाट पहात होता. मंगळवारी पुलाचे उदघाटन झाल्यानंतर वाहनचालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पूल सुरू होऊन दोन दिवस होत नाही तेच पुलावर छोटे दोन तीन खड्डे पडले आहेत. यावरून आता गाजावाजा करीत उदघाटन करणाऱ्या पालिका प्रशासनाला ट्रोल करण्यास सामान्य नागरिकांनी सुरवात केली आहे. या खड्ड्यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करीत, पुलाचे व्हिडीओ व्हायरल करीत पालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. याविषयी ई सकाळवर गुरुवारी सकाळी कोपर पुलाला पडला पहिला खड्डा या मथळ्याखाली वृत्त प्रसारित होताच पालिकेचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा व अभियंत्यांनी पुलावर धाव घेत खड्डा तत्परतेने बुजविला.

जी तत्परता आज दाखवली तीच इतर खड्डयांप्रती दाखवा

कोपर पुलावर खड्डा पडल्याचे समजताच मनसे आमदार राजू पाटील व कार्यकर्ते पुलाच्या पाहणीसाठी आले. आमदार पुलावर पोहोचण्याआधीच पालिका अधिकाऱ्यांनी खड्डा बुजविला. यावर जी तत्परता हा खड्डा भरण्यास प्रशासनाने दाखवली, तेवढीच तत्परता शहरातील इतर खड्डे भरण्यात दाखवावी. खड्डे भरण्यासाठी 17 कोटीचा निधी आहे त्याचा वापर करावा असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला.

चांगल्या कामाला केवळ गालबोट लावायचे यांचे काम - सेनेची मनसेवर टिका

चांगल्या कामाला कसे गालबोट लावायचे हे काही पक्षांचे काम आहे. ते केवळ पाहणीच करू शकतात, विधायक कामे करू शकत नाहीत असा प्रति टोला शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदारांना लगावला. पुलावरील जॉईंट हे काँक्रीट चे आहेत त्यावरील डांबर निघाले होते. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम शिल्लक आहे.

हेही वाचा: मागाठाणे वनविभागातील नागरिकांना घरगुती दराने वीज पुरवठा; उर्जामंत्र्यांचे निर्देश

"सदर ब्रिज वरील डांबरीकरणामध्ये मास्टीक अस्फाल्टचा अंतर्भाव असतो. परंतू मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी कडक उन्हाची आवश्यक असते. गणेशोत्सवापूर्वी सदर पूल वाहतूकीस सूरु करण्यात यावा आणि नागरिकांना सुविधा देण्यात यावी या हेतूने मास्टीक अस्फाल्टचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आणि अस्फाल्टींग बिटूमनचा एक थर देऊन उड्डणपूल वाहतूकीस सुरु करण्यात आला.

सदरचे काम करताना मोठया प्रमाणात पर्जन्य वृष्टी होत होती त्यामुळे कोपर पूलावर काही ठिकाणी खड्डे पडणे अपेक्षित होते. आज पडलेला खड्डा हा रेल्वेच्या एक्स्पाशन जॉइंटच्या बाजूला आहे. तो तातडीने भरुन घेतला असून वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. दस-यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावर कडक उन्हात मास्टीक अस्फाल्टचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सदर दुरुस्तीकाम स्वखर्चाने करणे संबंधित कंत्राटदारास बंधनकारक आहे."

- सपना देवनपल्ली कोळी, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका

loading image
go to top