esakal | उद्या उद्धव ठाकरे भेटणार नरेंद्र मोदींना, कारण आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या उद्धव ठाकरे भेटणार नरेंद्र मोदींना, कारण आहे...

उद्या उद्धव ठाकरे भेटणार नरेंद्र मोदींना, कारण आहे...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.  उद्या सकाळी ही भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

उद्या दिल्लीतील भेटीनंतरच नक्की भेट कशासाठी झाली याबद्दल माहिती मिळू शकेल असं बोललं जातंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी केली आहे. अशात राज्याच्या तिजोरीत मात्र खडखडाट आहे. हेच पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे निधीची मागणी करू शकतात. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या नरेंद्र मोदी यांच्या भेटीस जाणार असल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी - "७ कोटी रुपये जमा करा, नाहीतर आम्ही शहीद व्हायला तयार"; लष्कर ए तोयबाचा ई-मेल

एकीकडे उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलंय. मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नसल्याने मुख्यमंत्री उद्या पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर कोणती गोड बातमी बळीराजाला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल.    

मोठी बातमी - वाईट बातमी : यावर्षी पगारवाढीची अपेक्षा ठेऊ नका, कारण...

cm uddhav thackeray to pm narendra modi for farmers loan wavier