esakal | शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; जीएसटीच्या पैशांवरून केंद्राला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray press conference before state budget session

दिल्लीत गृहखातं केंद्राकडं असताना तिथं 60 दिवसांपासून शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. तिथं ही अस्वस्थता आहे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; जीएसटीच्या पैशांवरून केंद्राला टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. योग्य कालावधीत शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती योजना पूर्ण करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांची यादी उद्या सरकार जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिशा सारखा कायदा महाराष्ट्रातही 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधfपक्षाकडून तूर आणि तांदूळ खरेदी संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात महिला सुरक्षे संदर्भात राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दल माहिती दिली. आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. त्या कायद्याची माहिती घेण्यासाठी आंध्र प्रदेश दौरा केल्याचं ही गृहमंभी देशमुख यांनी सांगितलं. दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र्रातही महिला सुरक्षे संदर्भात कायदा करण्याचा विचार असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

आणखी वाचा - राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत फेरबदलाची शक्यता 

आणखी वाचा - लग्नाच्या बनावट पत्रिकेत 5 कोटींचे ड्रग्ज 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. पण, राज्यात एकही दंगल झालेली नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. तिथं अशांतता आहे. उत्तर प्रदेशात दंगली घडत आहेत. दिल्लीत गृहखातं केंद्राकडं असताना तिथं 60 दिवसांपासून शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. तिथं ही अस्वस्थता आहे. असं असताना त्यांनी (भाजप) आपल्या राज्याकडं लक्ष द्यावं. केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळण्यात उशीर होतो आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यांना या संदर्भात कल्पना दिली आहे. महाराष्ट्राला जीएसटीचे पैसेही बुलेट ट्रेनसारखे मिळावेत.'

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • सीएए, एनपीआर बद्दल यापूर्वीच भूमिका स्पष्ट
  • सरकारच्या चांगल्या निर्णयाचं कौतुक करणं हेही विरोधकांचं काम
  • केवळ सरकारवर टीका करणं हे विरोधकांचं काम नाही 
  • राज्यात तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्यामुळं सरकार नीट काम करत आहे
  • राज्यातील सरकार आता स्थिरावले 
  • मुंबईत गिरणी कामगारांना मिळणार घरे, मार्चमध्ये लॉटरी