esakal | राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेला वादळाच्या तडाख्याचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेला वादळाच्या तडाख्याचा फटका

उद्धव, राज यांना घडविणाऱ्या शिक्षिका राहत असलेल्या वृद्धाश्रमाची दुर्दशा, पाहा Photos

राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेला वादळाच्या तडाख्याचा फटका

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार (मुंबई): तौक्ते वादळाने अनेकांचे बरंच काही हिरावून घेतलं. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. फळबागा, शेतीप्रमाणे अनेकांच्या घरांचेदेखील नुकसान झाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिकविणाऱ्या आणि घडविणाऱ्या शिक्षिका यांनादेखील या वादळाचा फटका बसला. राज्याचा प्रभावी नेत्यांना घडविणाऱ्या सुमन रणदिवे सध्या वसईत तुटलेल्या छताचा आधार घेऊन दिवस काढत आहेत. त्यामुळे या नुकसानीची पाहणी करावी आणि आम्हाला मदत करावी अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. (CM Uddhav Thackeray Raj Thackeray teacher Suman Randive sends SOS to CM after Cyclone Tauktae)

हेही वाचा: मोठी बातमी: मविआमध्ये मतभेद, काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार?

सुमन लक्ष्मण रणदिवे या शिक्षिका उद्धव ठाकरे आणि त्याचे बंधू राज ठाकरे यांच्यासहित मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे देत होत्या. सुमन रणदिवे या सध्या वसई परिसरातील सत्पाळा गावातील न्यू लाईफ केअर या वृद्धाश्रमात गेल्या एक वर्षापासून राहत आहेत. सोमवारी आलेल्या वादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले.

हेही वाचा: "तर ठाकरेंचे जगात कारखाने असते"; नितेश राणेंची बोचरी टीका

सुमन यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध लोक येथे राहतात. या वृद्धाश्रमात मुके, बहिरे असेही वृद्ध असल्याने वादळ आलं त्या रात्री आश्रम चालक राजेश मोरो, त्यांची पत्नी, मुलगी यांच्यासह सर्वजण रात्रभर जागे होते. वृद्धाश्रमातील वृद्धाना काही होऊ नये म्हणून त्यांनी स्वत: लक्ष घातलं. पण अचानक आलेल्या वादळामुळे त्यांना काहीही करायला वेळ मिळाला नाही.

हेही वाचा: लॉकडाउन कधी उठवणार? राज्याच्या मंत्र्याने दिलं स्पष्ट उत्तर

सर्व लोकांचे कपडे, त्यांच्या जवळील सामान, त्यांची कागदपत्रे, सारं काही पावसात भिजलं. आसऱ्यासाठी असलेल्या घराचे पत्रे तुटल्यामुळे त्यांना थेट उंच आकाशाकडेच पाहावं लागलं. वादळाने पत्रे पत्रे उडाल्याने त्यांचे बिछाने भिजून गेले. काही पंखे तुटले. वादळात आश्रमाचेही बरंच नुकसान झाले. वादळ थांबून आठ दिवस झाले पण या आश्रमाच्या छताला अद्याप पत्रा लागलेला नाहीत. जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशी परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनीच याकडे लक्ष द्यावं अशी साऱ्यांची भावना आहे.

(संपादन- विराज भागवत)