"जशास तसं उत्तर द्यावंच लागतं, पण म्हणून आम्ही शत्रू नाही"

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसमोर केलं सूचक वक्तव्य
Uddhav thackeray
Uddhav thackerayE-Sakal
Summary

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसमोर केलं सूचक वक्तव्य

मुंबई: मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आणि कायदा (Law) रद्द करण्यात आला. त्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी जवळपास एका वर्षानंतर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामुळे, राज्यपाल विरूद्ध मुख्यमंत्री हे शीतयुद्ध (Cold War) संपलं का? असा सवाल ठाकरे यांना पत्रकारांनी केला. यावेळी बोलताना, "समोरून जे बोललं जातं, त्यावर जशास तसं उत्तर द्यावंच लागतं. पण याचा अर्थ आम्ही कायमचे शत्रू नाही", असं सूचक उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर लवकरच या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केले. (CM Uddhav Thackeray Says We are not enemy for lifetime over Governor Koshyari Question)

Uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये फोनवरुन चर्चा

मराठा आरक्षणाबद्दल जो निकाल आला, त्याबद्दल आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे. आरक्षणाचा कायदा करणं हा राज्याचा अधिकार नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपती आणि केंद्र सरकार हा कायदा करू शकतात. त्यामुळे आमच्या सरकारच्या ज्या भावना होत्या, त्या पत्राच्या माध्यमातून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. या कायद्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठीचे पत्र आम्ही राज्यपालांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांचीही लवकरत भेट घेऊन त्यांनाही निवेदनपर पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Uddhav thackeray
"ज्या व्यक्तीला प्रशासनातील काहीच कळत नाही..."

"राज्यात झालेला मराठा आरक्षणाचा कायदा हा विधीमंडळात एकमताने संमत झाला होता. तो दुर्दैवाने रद्द झाला. आता याच संबंधीचे पत्र राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना दिलं आहे. अधिवेशन घेणार की नाही याचं उत्तर आता देऊ शकत नाही. कारण आम्ही टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार आहोत. सर्व गोष्टी विचाराधीन आहेत", असेही त्यांनी स्पष्ट केले.

"मराठा समाज खूप मोठा आहे. या समाजाने समजूतदारपणा दाखवला आहे. हा निर्णय घेतला, तेव्हा एकमाताने नियम करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही पक्ष त्यांच्याविरोधात नाही हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत त्यांनी संयम दाखवला यासाठी त्यांचे आभार आणि धन्यवाद", असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com