esakal | 'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

बोलून बातमी शोधा

'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद आमदार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. येत्या २१ मे रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूका घेण्यात येणार आहेत.

'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद आमदार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. येत्या २१ मे रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूका घेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाकडून २७ मे आधी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता निवडणुकीची तारीख देखील समोर येतेय. २१ तारखेला निवडणूक होणार असल्याने येत्या २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बनणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः या शर्यतीत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

सुन्न करणारं वास्तव ! कंपनीनं केली पगार कपात म्हणून त्यानं स्वतःला.... 

ज्या विधान परिषद ९ जागांसाठी निवडणूक होणार त्याची सविस्तर माहिती -

सध्या रिक्त झालेल्या जागा : भाजप  ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, शिवसेना १

शिवसेना : 
१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)

भाजप
१. श्रीमती स्मिता वाघ
२. अरुण अडसड
३. पृथ्वीराज देशमुख

२ मे पासून रुग्णालयांना लागू होणार 'हे' नवीन नियम, सरकारने घेतलेत 'मोठे' निर्णय...

राष्ट्रवादी काँग्रेस 

१. हेमंत टकले
२. आनंद ठाकूर
३. किरण पावसकर

काँग्रेस 
१. हरिभाऊ राठोड, 
२. चंद्रकांत रघुवंशी (निवडणुकीआधी दिला राजीनामा)

on this date uddhav thackeray will be elected as MLC