esakal | मालाडमधील पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे | cm uddhav Thackeray
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Chavan

मालाडमधील पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : येथील आंबेडकरनगर, पिंपरी पाडा (pimpari pada) येथील पुनर्वसनाचा (Rehabilitation) प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक आमदार विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची (cm uddhav Thackeray) भेट घेऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: अपना बँकेच्या नव्या योजनात महिलांना प्राधान्य

येथील वन विभागातील संरक्षण भिंत कोसळून ३१ जणांचा जीव गेला होता. अजूनही ही संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून कधीही अनर्थ घडू शकतो. येथील नागरिकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाचा लक्ष नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

१०० आंदोलन कार्यकर्त्यांनी पुनर्वसन लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, अशी घोषणा केली आहे. सरकारला पुनर्वसन करायचे नसेल तर आम्हाला पैसे द्या, आम्ही आमची घरे बंधू, असा पवित्रा घेतला आहे. आंबेडकरनगर, पिंपरी पाडा परिसरातील वन विभागाच्या हद्दीत असणारा हा भाग नागरी सुविधांपासून वंचित आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार साडे सात हजार रुपये भरून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारी ही झोपडपट्टी आहे. अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचा दरवाजा ठोठावून न्यायाची मागणी करीत आहे.

loading image
go to top