मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

घटनेतील १६४ (४) कलमानुसार विधिमंडळाचा सदस्य नसलेल्याला सहा महिन्यांच्या आत सदस्य होणे बंधनकारक असते. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात म्हणजे २७ मेपूर्वीच सदस्य होणे आवश्यक आहे.

मुंबई - जगभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालाय. अशात जगभरात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात आणि अनुषंगाने महाराष्ट्रात देखील झालेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी देशातील सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्यात. संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अनेक मोठे कार्यक्रम, अनेक मोठ्या यात्रा आणि निवडणूक देखील देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी - हा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर

अशात निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील काही महानगरपालिका निवडणूक आणि राज्यातील विधान परिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय पेच निर्माण होतोय की काय? उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागतोय की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर एक पर्याय म्हणून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने पुन्हा शपथ घेणं याबद्दल देखील चर्चा होती.  

दरम्यान याविषयी चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घटनात्मक पेच टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.  

मोठी बातमी -  कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत कशी कराल घराची सफाई? या गोष्टींकडे लक्ष ठेवा

घटनेतील १६४ (४) कलमानुसार विधिमंडळाचा सदस्य नसलेल्याला सहा महिन्यांच्या आत सदस्य होणे बंधनकारक असते. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात म्हणजे २७ मेपूर्वीच सदस्य होणे आवश्यक आहे. अशात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषद निवडणूक लांबणीवर जरी पडली असली तरीही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळात जाण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली गेलीये.

cm uddhav thackeray will become member of maharashtra legislative assebly through governor quota


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray will become member of maharashtra legislative assebly through governor quota