कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत कशी कराल घराची सफाई? या गोष्टींकडे लक्ष ठेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे आपण घराच्या बाहेर जात नसल्याने सुरक्षित आहोत. मात्र कोरोनाच घरात आला तर ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराचा आणि तुमचा कोरोनापासून बचाव करू शकता.

मुंबई : कोरोनामूळे संपूर्ण जग दहशतीत आहे. अनेक लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आपण अनेकजण आपल्या घरीच आहेत.

लॉकडाऊनमुळे आपण घराच्या बाहेर जात नसल्याने सुरक्षित आहोत. मात्र कोरोनाच घरात आला तर ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराचा आणि तुमचा कोरोनापासून बचाव करू शकता.

मोठी बातमी - महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत

घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या:

 • घरात अस्वच्छ जागा दिसली तर ती आगा पाणी आणि साबण टाकून स्वच्छ करा. 
 • डिसइन्फेक्टंट सोल्यूशननं ती जागा साफ करून घ्या.
 • ती जागा संपूर्ण कोरोडी होत नाही तोवर तिथे जाऊ नका.
 • स्वछ्तेदरम्यान घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा.

कपडे धुताना अशी घ्या काळजी:

 • अस्वच्छ कपड्यांना हात लावण्याआधी मास्क आणि हातमोजे घाला.
 • बाहेरून घालून आलेले कपडे वेगळे ठेवा.
 • आजारी व्यक्तींचे कपडे इतर कपड्यांसोबत धुवू नका.
 • कपडे वळत घालण्याच्या ठिकाणाला स्वच्छ ठेवा.
 • वापरलेले ग्लव्स कचरापेटीत टाका.

मोठी बातमी - मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढवणाऱ्या 'या' आहेत ११ केसेस

आजारी व्यक्तीची खोली साफ करताना:

 • घरात कोणी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांची खोली वेगळी ठेवा.
 • आजारी व्यक्ती वापरत असलेल्या प्रसाधनगृहाचा वापर करू नका.
 • शक्य असेल तर आजारी व्यक्तीलाच त्यांची खोली स्वच्छ करायला सांगा.
 • आजारी व्यक्तीनं वापरलेली वस्तू वापरू नका.
 • आजारी व्यतीची काळजी घ्या मात्र त्यांच्या संपर्कात येऊ नका.

घरातल्या वस्तू स्वच्छ करताना:

 • घरातल्या वस्तूंना स्वच्छ करताना आधी हातमोजे घाला आणि मास्क लावा.
 • दारं, खिडक्या डिसइन्फेक्टेड लिक्विडनं साफ करून घ्या.
 • स्वच्छता झाल्यानंतर हे मास्क आणि ग्लव्स कचरापेटीत टाका. शक्य असल्यास सुरक्षित जागी जाळून टाका.  
 • त्यानंतर आपले हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून घ्या.

how to to keep our home safe and clean from novel corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to to keep our home safe and clean from novel corona virus