"तुम्हाला देखील मुलं आहेत, मी जर मागे लागलो तर तुमचं काही खरं नाही"; उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाकडे ?

सुमित बागुल
Friday, 27 November 2020

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत महाविकास आघाडी आणि खासकरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. या निमित्ताने सामानाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची विशेष मुलाख घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित झाली. दरम्यान या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची काही आक्रमक वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतायत. गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले, शाब्दिक चिखलफेक झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत महाविकास आघाडी आणि खासकरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

महत्त्वाची बातमी : वेश्याव्यवसायातील महिलांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, मिळणार 5 हजारांची मदत

या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी भाषेत सुनावलं आहे. आरोप करणाऱ्यांना उद्धव ठाकरे म्हणालेत की, आरोप करणार्यांनी स्वतः आधी आरशात पाहावं. तुम्हालाही मुलं आहेत. तुम्ही देखील काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. मी जर मागे लागलो तर तुमचं काही खरं नाही. 

दिशा सालियान आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा रोख त्यांच्याच कडे आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत.  

महत्त्वाची बातमी : अखेर मान्यता मिळाली ! मुंबईत सुरु होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीची सर्वात मोठी चाचणी

दरम्यान, नुकतीच ED ने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली. यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्याचे कनेक्शन थेट मातोश्रीपर्यंत असल्याचेही आरोप केलेत. यावरूनही उद्धव ठाकरे नाराज असल्याचं या मुलाखतीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तुम्ही ED किंवा CBI यांच्या माध्यमातून सरकारच्या किंवा माझ्या मागे लागलात तर मी देखील तुमच्या मुलांच्या मागे लागेन, असे थेपटणे उद्धव ठाकरे यांनी सुचविले आहे.

CM uddhav thackerays interview to samana warns opposition for targeting son aaditya thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thackerays interview to samana warns opposition for targeting son aaditya thackeray