मेट्रो-3च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

CM-Devendra-Fadnavis
CM-Devendra-Fadnavis

मुंबई : मेट्रो-३ च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शुक्रवार) करण्यात आले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.मे.रे.कॉ) मेट्रो-3चे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया लि. ही कंपनी करणार आहे. मेट्रो-3 मार्गिकेचे या संपूर्णतः भूमिगत मार्गिकेला अॅक्वा लाईन असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना हा नावाला सुयोग्य अशी करण्यात येणार आहे.

मेट्रो-3 मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण 31 गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या 'मेक इन इंडिया' या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-3च्या सर्व गाड्यांची निर्मिती अँलस्टाँम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-3 चे डब्बे अद्ययावत असणार असून विना चालक कार्यान्वित करण्यासाठी सक्षम असणार आहेत.

मेट्रो-३ डब्यांच्या संकल्पनेविषयी 
कधीही न झोपणारे आणि गतिमान शहर म्हणून प्रचलित असणाऱ्या मुंबईची प्रेरणा घेऊन मेट्रो-3 चे डबे डिझाईन करण्यात आले आहेत.

मुंबईचा समुद्र आणि वाहत्या पाण्याचा ताजेपणा आणि गती या पासून प्रेरणा घेऊन या डब्यांची रंगसंगती ठरविण्यात आले आहे. यामध्ये फिका हिरवा (अॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगाचा वापर करण्यात आला असून हिरवा रंग समुद्राच्या लाटांचा प्रवाहिपणा, ताजेपणा आणि गती तसेच पिवळा रंग हा आरामदायी प्रवासाचे प्रतीक आहे.

मेट्रो-3द्वारे प्रवाशांना आरामदायी सुखकर, वेगवान व शाश्वतसेवा मिळणार आहे. कार्यान्वित झाल्यावर मेट्रो-3 मुंबईची नवीन जीवन वाहिनी ठरणार आहे.

असे असतील मेट्रो-3चे डबे :

1) संपूर्णतः वातानुकूलित सह आर्द्रता नियंत्रण, सुरक्षित आरामदायी प्रवास
2) प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिराती करिता 'एलसीडी'चा वापर
3) डिजिटल मार्गिकेचा नकाशा, प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर,
अतिशय सुंदर बैठक व्यवस्थेसह उभे राहण्यासाठी खांबांची व्यवस्था
4) दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेयर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
5) सुखकर प्रवासाच्या अनुभूतीकरिता अद्ययावत एयर सस्पेन्शनचा वापर
6) प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्हीची सुविधा, आगीपासून सुरक्षेसाठी प्रत्येक डब्ब्यात अग्निशमन, धूर व अग्नी शोधक यंत्रणा
7) आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद राहण्यासाठी ध्वनी संवाद (voice communication) यंत्रणा

याविषयी प्रतिक्रिया देताना मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे म्हणाल्या, "मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मेट्रो-3च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण होणे, हा आमच्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे. मेट्रो-3च्या डब्यांच्या निर्मितीस नोव्हेंबर 2019 पासून सुरुवात होणार असून पहिली गाडी एका वर्षाच्या आत मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com