CNG-PNG Price Hike: एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढले CNG-PNG चे दर; मुंबईकरांना बसणार झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG-PNG Price Hike check cng png latest price and latest price in mumbai

CNG-PNG Price Hike: एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढले CNG-PNG चे दर; मुंबईकरांना बसणार झळ

CNG-PNG Price Hike : देशात सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे लोकाच्या खिशाला झळ पोहचत आहे. यादरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महिनाभरात पुन्हा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यावेळी सीएनजीच्या दरात 3.50 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढलेल्या किमती तत्काळ लागू करण्यात आल्या आहेत. इंधनाच्या दरात ही वाढ झाल्याने मुंबईकरांच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

लोकांचे बजेट बिघडणार

मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी मुंबईत सीएनजीची किंमत 86 रुपये प्रति किलो होती. त्याच वेळी, पीएनजीची किंमत प्रति एससीएम 52.50 रुपये होती. आता या किमतीत वाढ करून सीएनजीचा दर 89.50 रुपये प्रति किलो आणि पीएनजीचा दर 54 रुपये प्रति एससीएम झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांचे वाहने चालवणे आणि सार्वजनिक वाहतुक वाहने चालवणे महाग होणार आहे. तसेच पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याने त्यांच्या घराचे बजेटही बिघडणार आहे.

हेही वाचा: Elon Musk: 'ठुकरा के मेरा प्यार…'; ट्विटर विकत घेताच इलॉन मस्कच्या 'एक्स गर्लफ्रेंड'चं अकाउंट डिलीट

सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सलग दोन वेळा सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे महागाईचा फटका जनतेला अधिकच बसणार आहे.

हेही वाचा: Congress: 'बहिण-भावाचं पटत नाहीये, म्हणून दीड महिना होऊनही…''; राहुल-प्रियंकाबाबत भाजप नेत्याचा दावा

टॅग्स :cngPNG