esakal | कोळसाधारित विद्युत प्रकल्पांचा मुंबईला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोळसाधारित विद्युत प्रकल्पांचा मुंबईला धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या आसपास असणाऱ्या कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांतून होणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईला धोका असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दरवर्षी मुंबईतील अकाली मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढण्याची भीती असून मुदतपूर्व जन्म आणि अस्थमा आजार अधिक बळावणार असल्याचा इशारा ‘सी ४० सिटीज’ने आपल्या अहवालात दिला आहे.

देशातील सध्याचे कोळसाधारित विद्युत निर्मिती प्रकल्प आणि भविष्यातील त्यांचा विस्तार व नवीन प्रकल्पाच्या अनुषंगाने ‘सी ४० सिटीज’ने केलेले नवीन संशोधन आज प्रसारित झाले. कोळसाधारित विद्युतनिर्मिती ६४ गिगावॉटने वाढवण्याच्या सध्याच्या योजनेमुळे होणाऱ्या हवाप्रदूषणातून दरवर्षी मुंबईतील अकाली मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली आहे. देशभरातील कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांपैकी ९ टक्के मुंबईपासून ५०० किमी अंतरावर आहेत. कोळसा जाळून होणाऱ्या विद्युतनिर्मितीदरम्यान पसरणारे हवाप्रदूषण लांबवरचा प्रवास करत असून त्याच्या कॉन्सन्ट्रेशन लेव्हलमुळे सर्वांनाच धोका निर्माण होतो. विशेषत: तरुण, वृद्ध आणि गर्भवती महिलांना अधिक धोका असतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: जुलैमध्ये थायलंडला जायचा प्लॅन आहे? अवघ्या 72 रुपयात मिळणार हॉटेल रूम आणि बरंच काही

मुंबईतील हवाप्रदूषण जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा तिपटीने अधिक आहे. कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांच्या सध्याच्या राष्ट्रीय योजनांनुसार २०२० ते २०३० मध्ये २० टक्क्यांनी घट होण्याऐवजी २८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. चालू दशकात मुंबईत ६,२०० अकाली मृत्यू आणि ३,२०० मुदतपूर्व जन्म होण्याची शक्यता आहे. अस्थमा आपत्कालीन परिस्थितीमुळे ४,४०० जणांना रुग्णालयात धाव घ्यावी लागू शकते. पुढील दशकभरात आजारी रजांचे दिवस २.४ दशलक्षाहून अधिक वाढण्याची शक्यताही संशोधनातून मांडण्यात आली आहे.

हेही वाचा: देशातील प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न : गडकरी

मुंबई जवळील कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करण्याची गरज आहे. नव्याने विद्युत प्रकल्प उभारू नयेत. राज्य आणि केंद्राने स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक करावी.

- डॉ. रेचेल हक्स्ले, विभागप्रमुख,

‘सी ४० सिटीज’ नॉलेज आणि रिसर्च. नवीकरणीय ऊर्जेचा वाटा २०२५ पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत जाईल. ऊर्जेचा वापर कमी करण्यात येत असल्याने कोळसाधारित ऊर्जेचे प्रमाण कमी होईल.

- सौरभ पुनमिया जैन, संशोधन आणि सार्वजनिक धोरण सहाय्यक, पर्यावरण मंत्रालय.

loading image
go to top