

Coastal Road Porsche Accident
ESakal
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर एका भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळल्यामुळे हा अपघात झाला असून या भीषण धडकेत गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. या अपघातात सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नसली तरीही या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.