

Coastal Road BMW Accident Video
ESakal
मुंबई : कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात होऊन तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे ५.२० वाजेच्या सुमारास लाला कॉलेजसमोर, लोटस जेट्टीजवळ घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.