
मुंबई : कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे लोकांनी फिरण्यासाठी मोकळी जागा, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या गुरुवारी (ता १४) दुपारी १२.३० वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. वांद्रे (पूर्व) येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा ऑनलाईन होणार आहे.