Mumbai News : मुंबई विमानतळावर 28 कोटींची कोकेन जप्त; नोकरीच्या बहाण्याने ड्रग तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cocaine worth 28 crore seized at Mumbai airport; Drug smuggling employment mumbai crime

Mumbai News : मुंबई विमानतळावर 28 कोटींची कोकेन जप्त; नोकरीच्या बहाण्याने ड्रग तस्करी

मुंबई : सोमवारी मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत एका भारतीय प्रवाशाला 2.81 किलो कोकेनसह अटक केली. पकडलेल्या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 28.10 कोटी एवढी आहे.

आरोपी प्रवाशाने आपल्या बॅगेत बनवलेल्या गुप्त कप्प्यात अमली पदार्थ लपवून आणले होते.आरोपी प्रवाशाने एका महिलेशी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. महिलेने, आधी आरोपी प्रवाशाला नोकरी देण्याचे अमिष दाखवले.

त्यासोबतच त्यांच्याशी गोड बोलून जवळीक साधली. तसेच शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवले. या सगळ्यात फसून आरोपी प्रवाशाने आफ्रिकेतील अदीस अबाबा येथून कोकेन घेऊन मुंबई विमानतळावर आणले .

पुढे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईट मध्ये आरोपी प्रवास करणार होता. अटक प्रवाशाला मुंबईतील न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या टोळीमागचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.