

FDA Action In Mumbai
ESakal
मुंबई : मुंबईतील हॉटेल, उपाहारगृहे आणि अन्नपदार्थ साठवणूक केंद्रांतील अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत उघड झाला आहे. मालाडमधील हाॅटेलमध्ये अन्नपदार्थांत जिवंत झुरळे, तर भांडुपमधील ‘झेप्टो’च्या केंद्रात तापमानातील त्रुटी आणि अस्वच्छता आढळली. वांद्रे, सांताक्रूझ, काळबादेवीसह विविध भागांतील आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. अनेकांचे परवाने आणि नाेंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांकडून लाखोंचा दंडही वसूल करण्यात आला आहे.