esakal | नारळ लागवडीचे रोगांपासून संरक्षण आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नारळ लागवडीचे रोगांपासून संरक्षण आवश्यक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : पालघर (Palghar) जिल्ह्यात ५ हजार हेक्टर (Hector) जमिनीवर नारळाची लागवड केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या झाडावर (Tree) येणाऱ्या रोगामुळे नारळाच्या (coconut) उत्प कमालीची घट झाली आहे. त्यामुळे या रोगाचे संशोधन करून सरकारने उपाययोजना करण्याची मागणी जागतिक नारळ (coconut) दिनाच्या (Day) पार्श्वभूमीवर पालघर (Palghar) जिल्ह्यातील (District) बागायतदारांकडून होत आहे.

आहारापासून ते औषध, पूजेसाठी वारळाचे महत्व अनन्य साधारण आहे. नारळीच्या झाडाचे फायदेही अनेक आहेत. नारळाचे महत्त्व व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी 'जागतिक नारळ दिन' साजरा केला जातो.. वसई, बोडी, केळवे, पालघर, डहाणू भागात विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे.

याठिकाणी नारळाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, गावागावात विभागाकडून पालघर जिल्ह्यातील देखील नारळाचे उत्पन्न घेणारे वागायतदार मोठ्या संख्येने आहेत. झाडापासून माडी तयार केली जाते. शहाळीसह सुके नारळ विक्रीसाठी बाजारपेठेत जात असतात. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात वसई, पालघर भागातील नारळाला अधिक मागणी आहे. पूर्वी नारळाच्या झाडाच्या झावळ्या विणण्यासाठी, खराटा तयार करण्यासाठी विक्री होत होत्या. तर मुंभ तयार करण्यासाठी देखील त्यांचा वापर व्हायचा. काळाच्या ओघात हा व्यवसाय डबघाईला आला आहे. जिल्ह्यातील बागायतदार हा नारळाच्या झाडांना पांढऱ्या माशी रोगा करण्यासाठी औषध फवार काळजी घेत असतात.

मात्र गेल वर्षांपासून नारळाचे उत्पन्न कमी नारळाच्या झावळोला लागण हे उत्पन्न घटण्याचे प्रमुख जात आहे. त्यामुळे बागायत झाले आहेत. माडाची झाडे बेसुमार असली तरी गती येण्यासाठी सरक व्हायला हवे, अशी मागणी वा लागले आहेत.

हेही वाचा: राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांचा केरळ ते काश्मीर सायकल प्रवास

बागायतदारांना मार्गदर्शन

केरळ राज्यातील कोची कृषी विभागाकडून पालघर जिल्ह्यातील बागायतदारांना जागतिक नारळ दिनानिमित्ताने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात बागायतदारांसह कृषी विभागाचे अधिकारी ऑनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी तरुण वैती यांनी दिली.

देशातील काही ठराविक लागवडींवर रोगाचे सावट आले त्वरित दखल घेऊन उपायोजना केल्या जातात. मात्र नार लागवडीला तितके महत्व दिले जात नाही. 'बुरशी' हा रोग आहे. त्याचे संशोधन करण्याची गरज आहे. तरच उत्पन्न वाढेल व आ नुकसान होणार नाही.

· सुभाष भट्टे, वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी

loading image
go to top