Bird Flu ला घाबरू नका, मृत पक्षी आढळल्यास 'या' हेल्पलाईनवर संपर्क साधा

समीर सुर्वे
Tuesday, 12 January 2021

मांस आणि मटणाच्या दुकानांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासनाने बाजार विभाला दिले आहेत.

मुंबई, ता.12 : मुंबईतील कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'मुळे झाल्यचे स्पष्ट झाल्याने महानगर पालिकेने मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्याचबरोबर भायखळा विरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयाला दक्षतेचा इशारा दिला आहे.

महानगर पालिकेने काल रात्री मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली प्रसिध्द केली आहे. यामध्ये मृत पक्षाला खड्ड्यामध्ये पुरताना चुनखडीचा वापर करावा. तसेच, हा खड्डा भटक्या प्राण्याकडून उकरला जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात याव्यात. ही जबाबदारी घन कचरा विभागावर सोपविण्यात आली असून तसेच याबाबत राज्य सरकारच्या रॅपिड ॲक्शन टिमला माहिती द्यावी, असे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयांना रोजच्या राेज अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मुंबई पालिका प्रशासनानेही दक्षता घेण्याचे निर्देश भायखळा प्राणिसंग्रहालयाला दिले आहेत.

स्वच्छतेचा आराखडा

मांस आणि मटणाच्या दुकानांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासनाने बाजार विभाला दिले आहेत. त्याचबराेबर या दुकानांच्या स्वच्छतेसाठी आराखडा तयार करुन त्याची अमंलबजावणी करुन घ्यावी असेही निर्देश दिले आहेत.

Health Alert | मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने 'हेल्थ अलर्ट' जारी

घाबरु नका, हेल्पलाईनवर संपर्क करा : 

परीसरात मृत पक्षी दिसताच घाबरु नये अथवा त्यांना हात लावू नये. ‘मृत पक्षांची माहिती महापालिकेच्या 1916 या क्रमांकावर कळावे.या क्रमाकांमार्फत ही माहिती संबंधीत प्रभागातील घनकचरा विभागापर्यंत पाेहचविण्यात येईल.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

( संपादन - सुमित बागुल )

code of conducts issued to burry dead birds contact on 1916 if any dead bird is seen


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: code of conducts issued to burry dead birds contact on 1916 if any dead bird is seen