पालिकाच बनवणार कोल्डमिक्‍स 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

मुंबई - मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या महापालिकेने यंदा स्वत:च कोल्डमिक्‍स बनवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन महापालिका या महिन्यात 1200 मेट्रिक टन कोल्डमिक्‍सचे उत्पादन करणार आहे. 

महापालिकेने गेल्या वर्षी 2500 मेट्रिक टन कोल्डमिक्‍स बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते; परंतु निविदा प्रक्रिया आणि कच्च्या मालाची अनुपलब्धता यामुळे हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. यंदा नियोजन करून कोल्डमिक्‍सचा वापर केला जाणार आहे. खड्डे असलेल्या रस्त्यांची प्रभागनिहाय यादी बनवली जात आहे. त्यानुसार आवश्‍यकतेप्रमाणे कोल्डमिक्‍स बनवता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय महापालिकेत चांगलाच गाजला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटल्याने यंदा महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेचे संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक त्याचप्रमाणे 24 विभाग अधिकाऱ्यांच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकांवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवता येईल. तक्रार दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत खड्डे भरण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

Web Title: Coldmix will make Municiapl