विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार वाहन परवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाचा शिकाऊ वाहन अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) वितरीत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ किर्ती महाविद्यालय येथे 16 जानेवारी 2017 पासून होत आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिली.

महाविद्यालयातील विद्यार्थांचा पहिला शासकीय यंत्रणेशी थेट संबंध शक्‍यतो वाहन परवान्याच्या निमित्ताने त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात येतो. अशा वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दलालांच्या संपर्कात आल्याने संबंधित विद्यार्थ्यांचा शासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्याचा गैरसमज होण्याची शक्‍यता असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा होणारा गैरसमज दूर करून वाहन परवाना थेट त्यांच्या महाविद्यालयामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत योग्य त्या कागदपत्रांची तपासणी करून देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची बहुमोल शैक्षणिक वेळ, तसेच प्रवास खर्च आणि श्रमाची बचत होऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

Web Title: College students get the vehicle's license