

Ritu Tawde rejected inquiry report of Chembur Incident
ESakal
मुंबई : चेंबूर येथील दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने सादर केलेला चौकशी अहवाल महापौर रितू तावडे यांनी फेटाळला आहे. या प्रकरणात कंत्राटदार आणि सल्लागारावर दंडात्मक कारवाई करून उद्यान विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला आहे. आयुक्तांनी फेरचौकशी करून सुधारित अहवाल सादर न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.