esakal | सहायक आयुक्त हल्ला प्रकरण, पालिका अधिकाऱ्यांकडून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्त हल्ला प्रकरण, पालिका अधिकाऱ्यांकडून निषेध

सहायक आयुक्त हल्ला प्रकरण, पालिका अधिकाऱ्यांकडून निषेध

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेतील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांची माथेफिरू फेरीवाला अमरजित यादव याने हल्ला करून, बोटे छाटल्याचे पडसाद महाराष्ट्रातील अधिकारी वर्गात उमटू लागले आहे. महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटने सोबत उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हेही वाचा: अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजे - राज ठाकरे

अनधिकृत बांधकाम निष्काशन विभागाच्या उपआयुक्त प्रियंका राजपूत, मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त तुषार सोनवणे यांनी याबाबत पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना निवेदन दिले आहे. सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम करताना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करताना या घटनेचा महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेने केलेल्या निषेधाची प्रत देखील प्रियंका राजपूत, तुषार सोनवणे यांनी निवेदना सोबत जोडली आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख, सरचिटणीस प्रशांत रसाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. या संघटनेचे कोषाध्यक्ष उल्हासनगरातील तत्कालीन उपआयुक्त जमीर लेंगरेकर आहेत.

loading image
go to top