esakal | अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजे - राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

raj thakceray

अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजे - राज ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ला हा निंदनीय प्रकार आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी ठाण्यात व्यक्त केले. ठाण्यातील खासगी रुग्णालयात जावून कल्पिता पिंपळे यांची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते. तसेच आमचे आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत, पोलीस आणि न्यायालय योग्य ती कारवाई करेल असा विश्वास असल्याचे देखील राज ठाकरे (raj thackeray) यांनी सांगितले.

ठाणे महापलिकेच्या (Thane munciapal) आयुक्त कल्पिता पिंपळे हे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पिंपळे यांची रुग्णालयात जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

हेही वाचा: निर्बंध उठवण्यासाठी ठाकरे सरकारचा 'वाटाघाटीचा' नवा धंदा - शेलार

दोन गोष्टी आपण पाहणं महत्त्वाचं आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि दुसरं अनधिकृत फेरीवाले. कालही मी म्हटलं त्याप्रमाणे जे काही घडलंय त्याचं दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. न्यायालयदेखील त्यांचं कर्तव्य बजावेल अशी पूर्ण अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होईल, असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Dombivli : निर्माल्यात टाकले जातेय जुने कपडे, प्लास्टिक..

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे

loading image
go to top