जनसंपर्क अधिकारी डॉ. भदाणेंना आयुक्तांनी केले अतिरिक्त कामातून पदमुक्त

दिनेश गोगी
गुरुवार, 17 मे 2018

उल्हासनगर : कामात सातत्याने डॅशिंगपणा ठेवत असल्याने नेहमीच वादात राहणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्कालीन आयुक्तांनी अतिरिक्त पदे दिली आणि तक्रारींचा ओघ वाढल्याने विद्यमान आयुक्तांनी या अधिकाऱ्याला अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले, ही व्यथा आहे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.युवराज भदाणे यांची.

उल्हासनगर : कामात सातत्याने डॅशिंगपणा ठेवत असल्याने नेहमीच वादात राहणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्कालीन आयुक्तांनी अतिरिक्त पदे दिली आणि तक्रारींचा ओघ वाढल्याने विद्यमान आयुक्तांनी या अधिकाऱ्याला अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले, ही व्यथा आहे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.युवराज भदाणे यांची.

राजेंद्र निंबाळकर हे आयुक्त असताना त्यांनी काही महिन्यापूर्वी जनसंपर्क अधिकारी डॉ.भदाणे यांच्याकडे मालमत्ता कर विभागाचे विशेष पद दिले होते. त्यावेळी कामचुकार कर्मचाऱ्यांना वेतनवाढिची शिक्षा,मोबाईल टॉवर वाल्यांकडून विक्रमी वसुली करणारे भदाणे यांनी लाच देऊ पाहणाऱ्या एका व्यापाऱ्याला ठाणे लाचलुचपत विभागाद्वारे पकडून दिले होते. त्यानंतर निंबाळकर यांनी डॉ. भदाणे यांच्यासाठी विशेषकार्य अधिकारी हे पदनिर्मित करून त्याद्वारे त्यांच्याकडे संपूर्ण उल्हासनगरचा अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख, शिक्षण मंडळ,पाणी पुरवठा अशा अतिरिक्त पदांवर नियुक्ती केली होती.

मात्र निंबाळकर यांनी निर्मित केलेल्या विशेषकार्य अधिकारी या पदाबाबत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी,रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष-गटनेते भगवान भालेराव,शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी हरकत घेतली. हे पद नियमबाह्य असल्याचा आरोप केला. वणवा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार यांनी थेट राज्यपाल,मुख्यमंत्री,नगरविकासमंत्री, सचिव आदींकडे लेखी तक्रार केली. त्याचे पडसाद उमटले.

एक महिना मसूरी येथे शासनाच्या वतीने प्रशिक्षणाला गेलेले विद्यमान आयुक्त गणेश पाटील यांनी मसूरी येथून परत उल्हासनगरात आल्यावर भदाणे यांना अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले. त्यामुळे आता भदाणे यांच्याकडे त्यांचे जनसंपर्क अधिकारी हे मूळ पद राहिले आहे.

दरम्यान, भदाणे यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभागाचा अतिरिक्त पदभार आला. तेव्हा त्यांनी बांधकामांना उद्धवस्त करून बिल्डर-ठेकेदारांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला होता. मात्र यावेळेस भदाणे यांनी बेकायदा बांधकामांना उद्धवस्त करण्यासोबत एमआरटीपी गुन्हे दाखल करण्याची छाप सोडली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.

याबाबत भदाणे यांच्या कार्यालयात विचारणा केली असता,ते तिथे नव्हते. मोबाईल नॉट रिचेबल मिळत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: the commissioner have been Released dr Bhadane from their additional work