उल्हासनगरात सभापतींचा मुलगा हाताळतो कारभार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

प्रभाग समिती 3 च्या कार्यालयात महिला सभापती आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा या कार्यालयाचे कामकाज पाहत आहे. प्रभागातील बेकायदेशीर कामात सभापती ज्योती चैनानी यांचा मुलगा कैलाश चैनानी आणि अधिकारी हे संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विद्यार्थी सेलचे अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केला आहे.

उल्हासनगर : प्रभाग समिती 3 च्या कार्यालयात महिला सभापती आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा या कार्यालयाचे कामकाज पाहत आहे. प्रभागातील बेकायदेशीर कामात सभापती ज्योती चैनानी यांचा मुलगा कैलाश चैनानी आणि अधिकारी हे संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विद्यार्थी सेलचे अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केला आहे. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी महापालिका आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली आहे.
या आरोपाचे निवेदन समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. दुसरीकडे सभापतींच्या पतीने या आरोपांचा समाचार घेताना यात काही तथ्य नसून, मुलगा आईच्या मदतीने नागरी प्रश्न सोडवत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उल्हासनगर 4 परिसरात सोमवारी बाजारपेठ बंद असतात. यावेळी रस्ते मोकळे बघून अनधिकृत बाजारपेठ भरवली जाते. याचा परिणाम प्रचंड वाहतूककोंडी होऊन लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा सर्व परिसर प्रभाग समिती-3 च्या अंतर्गत येतो. या प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नाही. 

या संदर्भात सभापती ज्योती चैनानी यांचे पती रमेश चैनानी यांना विचारले असता ते म्हणाले, प्रभाग समिती - 3 मध्ये माझी पत्नी ज्योती चैनानी या सभापती आहेत त्यांच्या कार्यालयात मी किंवा माझा मुलगा कैलाश चैनानी कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करीत नाही. हे आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहेत. याशिवाय ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचे नातलग कार्यालय हाताळतात. पुरुष मंडळी नागरिसमस्या घेऊन येतात. त्या सोडवणे गुन्हा ठरतो काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: commit president's son takes charge in Ulhasnagar