घाटांतील अपघात रोखण्यासाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या सोमवारी (ता. 13) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समितीमध्ये संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ता सुरक्षेसंदर्भातील तज्ज्ञ आदींचा समावेश करण्यात यावा आणि समितीने सहा महिन्यांत सरकारला अहवाल सादर करावा, अशा सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बैठकीत दिल्या.
Web Title: Committee for accident in ghat diwakar raote